मांडरे येथे स्वच्छतेसाठी एक तास  श्रमदान

स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत कचरा मुक्त भारत या संकल्पनेतून रविवारी १ ऑक्टोबर  रोजी ग्रामपंचायत व   विद्या मंदिर मांडरे यांच्या वतीने  स्वच्छतेसाठी एक श्रमदान करण्यात आले. सुरुवातिला

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढून स्वछतेचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय, महादेव मंदिर परिसर,  गल्ली व प्राथमिक शाळेचा परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. 

उपक्रमात माजी सरपंच  कृष्णात रा.सुतार, पंढरी पाटील,मुक्ताबाई  सुतार, छाया रोटे , संपदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विद्या मंदिर मांडरे शिक्षक वर्ग, अगंणवाडी शिक्षका व कर्मचारी,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!