घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर गोकुळ शॉपी चे उद्घाटन संपन्‍न

कोल्हापूर:०८:

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या दूध व दुग्‍धपदार्थ शॉपीचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर बिनखांबी गणेश मंदिर शेजारी उद्घाटन सोहळा संपन्‍न झाला.

गोकुळ दूध,तूप,पनीर,दही,ताक,लस्सी,श्रीखंड सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. महालक्ष्‍मी मंदिर व बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील नगरिकांना व बाहेरील जिल्‍ह्यातील येणारे भाविकांना गोकुळची विविध दर्जेदार दुध उत्पादने दुग्‍धपदार्थ उपलब्ध होतील असे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी सांगीतले.

यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, मार्केटिंग व्‍यवस्‍थापक हणमंत पाटील शॉपी मालक कमलेश डोंगरे, स्वप्नील नवाळे, संघाचे अधिकारी लक्ष्‍मण धनवडे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अजित आडके, आदी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!