सावधान : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर : पडलेले झाड अपघाताला निमंत्रण देणारे
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे ता. करवीर येथे बालिंगा पुलाच्या पश्चिमेला वार्यामुळे झाड मोडून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. हे झाड रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण देणारे ठरणार आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा पूलाच्या पश्चिमेला दोनवडे बाजूला विलाइ चिंचेचे मोठी झाडे आहेत. वाऱ्यामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास एका मोठ्या झाडाची मोठी फांदी मोडून रस्त्याच्या कडेला पडली.
यावेळी नागरिकांनी चिंचा तोडण्यासाठी एकच गर्दी केली होती. आणि मोठ्या उतारावर हा भाग असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. काटेरी झाड असल्यामुळे झाड हटवण्यासाठी जेसीपी ची गरज आहे. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना फांदी रस्त्यात पडलेली न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन फांदी हटवावी अशी मागणी होत आहे.