सावर्डे दुमाला येथील झिम्मा फुगडी स्पर्धेत चंद्रे व सोनाळी संघाने पटकविले दहा हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस

करवीर :

गौरी – गणपती सणानिमित्त कृषी विज्ञान रोपवाटिका व ग्रीन अर्थ ऑरगॅनिक याच्या संयुक्त विद्यमाने
सावर्डे दुमाला (ता.करवीर) येथे विमल मावशी यांच्या स्मरणार्थ भव्य मंगळागौर स्पर्धा – खेळ झिम्मा फुगडीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राधानगरी तालुक्यातील ज्ञानेश्वर माऊली महिला बचत गट चंद्रे व कागल तालुक्यातील नागनाथ महिला बचत गट सोनाळी या संघांनी प्रथम क्रमांकाचे १० हजार व सन्मानचिन्ह बक्षीस पटकावले.

स्पर्धेची सुरुवात आऊबाई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी आयोजक रुपाली कारंडे व युवराज कारंडे यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतला होता. तसेच वैयक्तिक गटातील स्पर्धेत सुमारे २०० महिलांनी सहभाग घेतला होता.

यावेळी आयोजन युवराज कारंडे म्हणाले, आमच्या वाटचालीत विमल मावशीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिच्या आठवणीना उजाळा मिळावा, महिलांचे पारंपरिक खेळाना प्रोत्साहन मिळावे, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धक संघातील सर्वांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून सहभागी स्पर्धाकांचे स्वागत केले.

पंच म्हणून एम.पी.पाटील सर, किरण पाटील सर , विश्वास पाटील सर यांनी काम पहिले. निकालानंतर आयोजक रुपाली कारंडे व युवराज कारंडे यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार, २ हजार, सन्मानचिन्ह व कृषी औषधे तसेच वैयक्तिक स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे अत्यन्त नेटके नियोजन व आयोजन केलेबद्दल जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आयोजन युवराज कारंडे यांचा सत्कार करण्यात आला. निलेश कारंडे सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माहिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

सांघिक गट :
1) प्रथम क्रमांक : ज्ञानेश्वर माऊली महिला बचत गट चंद्रे व नागनाथ महिला बचत गट सोनाळी,ता. कागल( विभागून).

2)द्वितीय क्रमांक : फुलबाग महिला बचत गट कपिलेश्वर व सखी ग्रुप वाळवे खुर्द ( विभागून).

3) तृतीय क्रमांक : निर्भया नारी ग्रुप वाकरे व शंकर पार्वती महिला गट पाटणकर सावर्डे ( विभागून).

4) उत्तेजनार्थ : सखी फुगडी संघ शिपेकरवाडी व सखी महिला संघ व्हनूर (विभागून).

वैयक्तिक गटातील विजेते :
चुईफुई :
१) ऋतुजा कांबळे (वाकरे),
२)अनुराधा नलवडे ( धोंडेवाडी ),३) अतिशा पाटील (वाकरे).

सूप नाचवणे :
हर्षदा बाटे, २) अनिता बाटे, ३) संचिता बाटे ( सर्व शिपेकरवाडी),

भरलेली घागर डोक्यावर घेऊन पळणे :
१)अर्चना गुरव (सावर्डे दु.),
२)पल्लवी चव्हाण ( कपिलेश्वर), ३) सीमा कवडे, (कपिलेश्वर).

काटवट कणा :
सलोनी शिपेकर – शिपेकरवाडी, सुप्रिया खुटाळे वाळवे खु., समिक्षा मोहिते सावर्डे दु., आरती गुंडप दुर्गुळवाडी (विभागून).

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!