एकही मातामृत्यू व बालमृत्यू नसलेले गाव : राज्यात झळकली
शिंदेवाडीची आशा पूजा शिंदे
कोल्हापूर :
राज्यभरात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे. अशा बिकट परिस्थितीत शिंदेवाडी ता. करवीर येथील आशा पूजा शिंदे हिने ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात आरोग्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच या गावात पूजा मुळे एकही मातामृत्यू व बालमृत्यू झालेला नाही. आशा स्वयंसेविकेची निवड मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठीच असते, आणि हा शासनाचा उद्देश पूजाने सार्थ ठरवला आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन या आरोग्य पत्रिकेत पूजा झळकली आहे. याविषयी पूजाचे कार्य व लेख प्रसिद्ध झाले असून राज्यात
उत्कृष्ट ठरले आहे.

राज्यात ७० हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आरोग्याची धुरा सांभाळत आहेत. सर्वत्र कोरोना ची दुसरी लाट असून घरे दारे बंद असताना यावेळी आरोग्याच्या कामासाठी आशा मात्र रस्त्यावर दिसतात. या आशा आरोग्याचा कणा बनल्या आहेत.
पहिल्या लाटेवेळी शिंदेवाडी या गावात
जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोणाचा विळखा बसला होता. चार वर्षाच्या बालकासह सुमारे तीस मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. या संकटावेळी पूजा शिंदे व त्यांचे कुटुंब पॉझिटिव्ह आले होते.
हे आवाहन पेलत,ग्रामपंचायतच्या माध्यमातून,सरपंच रंजना अंबाजी पाटील,सर्व सदस्य,आणि वडणगे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी खलीपे, डॉ. संगीता गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रवर्तक शुभांगी चेचर,राधा पाटील,
आरोग्य सेविका डी. एस.कासार यांच्या सहकार्यातून आशा पूजा शिंदे हिने कंबर कसली, आणि गावावर आलेल्या कोरोनाचा सामना केला, आणि कोरोनाची साथ आटोक्यात आणली.आता कोरोना काळात सरपंच
रंजना पाटील यांच्या सहकार्याने गावात शंभर टक्के लसीकरण करण्यात पूजाला यश आले आहे.गावात आता एकही कोरोना चा रुग्ण नाही.एक एक्टिव रुग्ण होता तोही बरा झाला आहे.अशी माहिती यावेळी सांगण्यात आली.
पूजाच्या कामामुळे गावात एकही मातामृत्यू, बालमृत्यू झालेला नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे अंतर्गत एकमेव मातामृत्यू नसलेले गाव आहे. तसेच तुटपुंजे मानधन असताना पूजाने पूरग्रस्त काळात या मानधनातील काही पैसे पूरग्रस्तांना दिले आहे.
तसेच करवीर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट आशा म्हणून चार वेळा पूजाचा पुरस्कार,व जिल्हा परिषदेचा प्रथम व द्वितीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले आहे.
पूजाच्या या कार्याची दखल घेत राज्याच्या पत्रिकेत दहा वर्षाचे तिचे आरोग्याचे काम प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पूजा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी सरपंच रंजना अंबाजी पाटील,उपसरपंच संदीप शिंदे,सदस्य सागर पाटील ,रेखा सुतार, जयश्री शिंदे, रंजना पाटील, मेघा पाटील, ग्रामसेवक एस एस पाटील,कर्मचारी
श्रीकांत शिंदे,डॉ.स्वेता माळी,
आरोग्य सहाय्यक,बी.एम.कांबळे, व्हि.एस .सरनाईक, उपस्थित होते.