कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प
कोल्हापूर :
वादळी वाऱ्यासह पावसाने करवीर तालुक्याचे पश्चिम परिसरात झोडपले,
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

दुपारी साडेतीन वाजता वाघळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर जीर्ण झालेली झाडे, आणि फांद्या तुटून खाली पडल्या,मार्गावर दोनवडे येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली असून , सामाजिक कार्यकर्त्यांनी खुपिरे साबळेवाडी मार्गे वाहतूक वळवली आहे.