यशवंत बँकेचा पंधरा टक्के लाभांश :
अध्यक्ष एकनाथ पाटील
करवीर :
यशवंत बँकेचा मागील आर्थिक वर्षात २३८ कोटीचा एकत्रित व्यवसाय झाला असून १४० कोटीच्या ठेवी झाल्या आहेत,मागील आर्थिक वर्षातील पंधरा टक्के लाभांश देत आहोत असे
अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी जाहीर केले.
यशवंत बँकेची ४८ वी वार्षिक सभा झाली यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, बँकेचा एकत्रित व्यवसाय ठेवी व कर्जे मिळून १७ टक्के इतकी वाढ झाली आहे ,एकत्रित व्यवसाय २३८ कोटी चा टप्पा पार केला आहे, ठेवीमध्ये १४ कोटींची वाढ झाली असून १४० कोटी ठेवी झाल्या आहेत, कर्जामध्ये २० कोटींची वाढ झाली आहे, थकबाकी एनपीए वसुलीसाठी चिकाटीने प्रयत्न करण्यात आले, यामुळे बँकेचा एन पी ए शून्य टक्के राहिला आहे , यावर्षीचा पंधरा टक्के लाभांश देत आहोत असे ते म्हणाले. बँकेच्या १० शाखा असून ग्राहकांना एसएमएस, एटीएम, आरटीजीएस, अशा सुविधा देण्यात येतात, लवकरच मोबाईल बँकिंग सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
प्रा. बी बी पाटील यांनी पगार तारण कर्जामध्ये २० लाखाचा जादा नफा झाला पाहिजे, पगार तारण कर्ज का थकले, गुंतवणुकीवरील व्याजात तीस लाख कमी पडले, किरकोळ खर्च वाढला अशा सूचना केल्या. अमर पाटील यांनी मागील कर्जे आहेत असे संचालकांनी म्हणू नये, नोकर भरती, डिझेल खर्च वाढला याबाबत सूचना केल्या. चंद्रकांत पाटील यांनी बँकेला पन्नास वर्षे होत असल्याने भेटवस्तूंसाठी ज्यादा तरतूद करावी अशी मागणी केली, भीमराव नाळे यांनी बँकेची प्रगती झाल्याबद्दल संचालकांच्या अभिनंदनचा ठराव मांडला व कर्जाचे व्याजदर कमी करावे अशी सूचना केली ,तीन ठिकाणी नवीन शाखा काढाव्या अशी मागणी केली .प्रकाश सरनोबत यांनी पंधरा टक्के लाभांश दिल्याबद्दल संचालकाच्या अभिनंदन केले, सुरेश रांगोळकर यांनी सूचना मांडली,सरपंच जोशना पाटील यांनी शैक्षणिक कर्ज सुविधा सुरू करावी ,सर्व सभासदांना एटीएम कार्ड द्यावे अशी सूचना मांडली.एस.एम. पाटील यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत १४ लाख कर्ज द्यावे अशी मागणी केली.
अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी कर्जाचे व्याजाचे उत्पन्न पुढच्या वर्षी वाढेल, जुनी ४०० कर्ज प्रकरणे रीकव्हर केल्याची सांगून कर्ज वाढल्यानंतर गुंतवणूक कमी होते ,बँकेची उलाढाल ३४ कोटीने वाढल्याचे तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळातून ५५० तरुणांना कर्ज प्रकरणे दिल्याचे ते म्हणाले. यावर्षी कर्जातून १ कोटी ९० लाख रुपये जादा उत्पन्न मिळाल्याचे ते म्हणाले.
अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी केले.आभार उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी मांनले.यावेळी संचालक सर्जेराव पाटील ,बाजीराव खाडे ,नामदेव मोळे, प्रकाश देसाई, सुभाष पाटील ,उत्तम पाटील, भगवान सूर्यवंशी सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.