प्रधानमंत्री पीक विमा योजना
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

कोल्हापूर :

रब्बी हंगाम 2021-22 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

योजनेची उदिष्टे…..
नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषि क्षेत्राच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे. जेणे करून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्याच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

योजनेची वैशिष्टे….
कर्जदार शेतक-यांना अधिसूचित पिकाकरीता व अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कुळासह कोणतेही शेतकरी सहभागी होवू शकतात. वास्तवदर्शी विमा आकारणी- शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा आहे. सर्व पिकासाठी जोखीम स्तर ७० टक्के आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्ष वगळून) गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल.

जोखमीच्या बाबी….
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागणी/लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.

पीक विमा योजने अंतर्गत घेण्यात आलेली अधिसुचित पिके –
(कोल्हापूर जिल्ह्यासाठी अधिसुचित महसूल मंडळासाठी)
रब्बी हंगाम- गहू (बागायत), ज्वारी (जिरायत) हरभरा,
उन्हाळी हंगाम- उन्हाळी भुईमुग,
शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव गहू व हरभरा पिकासाठी दि. १५ डिसेंबर २०२१ पुर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. उन्हाळी भुईमुगसाठी दि. ३० मार्च २०२२ विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३ वर्षासाठी निवड करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००१०२४०८८ असा आहे.
योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक सर्व सुविधा केंद्र (सी. एस. सी केंद्र)किंवा संबंधीत राष्ट्रीयकृत बैंक, वित्तीय संस्थेशी किंवा तालुकास्तरावरील विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधवा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!