गोकुळ कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धांसाठी आपुलकीचा हात

स्व:खर्चाने केले ताकाचे वाटप

कोल्‍हापूरःता. २०.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पोलिस आणि महापालिका कर्मचारी दिवसरात्र , ऊन पावसात देखील ड्यूटी बजावत आहेत . कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ( गोकुळ ) ताराबाई पार्क येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या स्व : खर्चातून ताक वाटपाचा उपक्रम राबविला .

खर तर गोकुळ दूध संघाचे कर्मचारी देखील कोविड योद्धे आहेत गेले दीड वर्षापासून अविरत पणे दूध उत्पादकांनकडून दूध घेवून ते मुंबई , पुणे , कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठत मध्ये विनाव्यतय पोहच करत आहेत.

ताराबाई पार्क कार्यालयातील सर्व कर्मचारी एकत्र येत पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांना ताक वाटप करायचे ठरवले आणि नियोजनानुसार ड्यूटीवरील पोलिस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ताक वाटप केले . या सामाजीक कार्यास संघाचे चेअरमन मा.श्री . विश्वास नारायण पाटील ( आबाजी ) व सर्व संचालकासो यांचे मार्गदर्शन मिळाले . यावेळी पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ . यु . व्ही.मोगले , संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर , डॉ.प्रकाश साळुखे , अशोक पुणेकर ताराबाई पार्क कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!