यशवंत बँकेस जिल्हा बँक असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट परफॉर्मन्स पुरस्कार : अध्यक्ष एकनाथ पाटील
करवीर :
यशवंत बँकेस जिल्हा बँक असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट परफॉर्मन्स पुरस्कार देण्यात आला, बँकेने गत वर्षात १४० कोटी ठेवीचे उद्दिष्ट गाठले, नेट एनपीए शून्य टक्के असून, एकूण व्यवसाय वाढ १७ टक्के झाली, या सर्व कामगिरीबद्दल जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने बँकेस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले अशी माहिती अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली. असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे ,उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी यांच्या हस्ते यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील ,उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर व संचालक यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन चा १०० ते २५० कोटी ठेव गटात प्रथम क्रमांकाचा सर्वोत्क्रुष्ट बँक पुरस्कार यशवंत बँकेस प्राप्त प्राप्त झाला आहे. बँकेची कर्जात २६ टक्के वाढ झाली, ठेवीत १२ टक्के वाढ झाली आहे. नेट एम पी शून्य टक्के असून, या संचालक मंडळाच्या कालावधीत पाच वर्षात बँकेची एकूण उलाढाल दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. एकूण उलाढाल १२० कोटी वरून २५५ कोटी वर गेल्याचे सांगितले.
बँकेने मराठा समाजातील सुमारे ५५० तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज प्रकरण दिले आहे. या प्रकरणांची व्यवस्थित परतफेड सुरू आहे. बँकेच्या विस्तारीकरणासाठी आणखी तीन शाखांची मागणी केली आहे. सभासदांना ग्राहकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी एटीएम, एसएमएस, आरटीजीएस सुरू आहे ,येत्या महिन्याभरात मोबाईल बँकिंग सुरू होईल, तसेच पाचवे एटीएम मशीन या महिन्याभरात कार्यरत होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. गतवर्षाचा १५ टक्के लाभांश वार्षिक सभे रोजी सभासदांच्या खात्यावर वर्ग केला अशी माहिती यावेळी अध्यक्ष पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर ,संचालक सर्जेराव पाटील, नामदेव मोळे, प्रकाश देसाई, बाजीराव खाडे, दादा पाटील ,सुभाष पाटील, सर्व संचालक उपस्थित होते.