यशवंत सहकारी बँकेला 2 कोटी 23 लाख ढोबळ नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील
करवीर :
यशवंत सहकारी बँकेला संपलेल्या मार्च 2021 या आर्थिक वर्षात 2 कोटी 23 लाख ढोबळ नफा झाला असून, गतवर्षीपेक्षा यंदा 19 कोटी 4 लाखांनी ठेवी वाढून एकूण 125 कोटी 32 लाखाच्या ठेवी झाल्याची माहिती अध्यक्ष एकनाथ पाटील यांची माहिती दिली. बँकेचा आर्थिक वर्षाचा प्रगतीचा आढावा यावेळी सांगण्यात आला, यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, व संचालक उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले कोरोना काळातही गतवर्षीपेक्षा बँकेने सर्व पातळीवर उत्तम कामगिरी केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 19 कोटी चार लाखाने ठेवी वाढून 125 कोटी 32 लाखाच्या ठेवी झाल्या आहेत. 78 कोटी 76 लाखाचे कर्जवाटप केले आहे.150 कोटी 25 लाखाचे खेळते भांडवल असून , शून्य टक्के एन. पी. ए. आहे. एकूण व्यवसाय दोनशे पाच कोटी नऊ लाखाचा झाला आहे. निव्वळ नफा एक कोटी, 21 लाख, 52 हजार झाला असून,
ढोबळ नफा 2 कोटी 23 लाख झाला आहे.मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेसाठी सुमारे शंभर तरुणांना 9 कोटीच्या वर कर्ज देऊन त्यांना पायावर उभे केले आहे. बँकेच्या वतीने सोनेतारण कर्जा ला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना एसएमएस बँकिंग, आरटीजीएस, नेफ्ट, एटीएम अशा सुविधा उपलब्ध केल्या असून बँकेचे
स्वतंत्र डी. आर. एस.साईट केली असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. कांबळे, संचालक आनंदराव पाटील, आबाजी शेलार,सर्जेराव पाटील, सुभाष पाटील ,एस.के.पाटील, एडवोकेट प्रकाश देसाई, संग्राम भापकर, दादासो पाटील,निवास पाटील ,प्रा.टि.एल.पाटील,उत्तम पाटील,
सर्व संचालक उपस्थित होते.