करवीर :
यशवंत सहकारी बँकेस संपलेल्या आर्थिक वर्षात चार कोटीचा ढोबळ नफा झाला असून एकूण १५६ कोटी ठेवी झाल्या आहेत. मराठा तरुणांना ५० कोटी कर्जवाटप केले आहे. यावर्षी पंधरा टक्के लाभांश देण्याचा मानस आहे असे प्रतिपादन यशवंत अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केले. पत्रकार बैठकीत माहिती दिली.
यावेळी पाटील म्हणाले आर्थिक वर्ष अखेर २७१ कोटी ४४ लाखाचा व्यवसाय केला असून १४ टक्के व्यवसाय वाढ होऊन नफ्यात ३३ टक्के वाढ झाली आहे. ठेवीमध्ये १४० कोटी वरून १५६ कोटी, म्हणजे १६ कोटी २० लाखाने वाढ झाली आहे. एनपीए शून्य टक्के असून चार कोटी ढोबळ नफा झाला आहे.
बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या वर्षात ग्राहकांना मोबाईल बँकिंग यूपीआय सेवा लवकरच सुरू करत आहोत, बँकेस रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नवीन तीन शाखाना मंजुरी मिळाली आहे या तीन शाखा लवकरच ग्राहकांच्या सेवेत रुजू करत आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप करणार असून यावर्षी विविध चार कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
बँकेस चार पुरस्कार मिळाले आहेत. तसेच चार एटीएम सुरू केले आहेत. गेल्यावर्षी पंधरा टक्के लाभांश दिला या वर्षी १५ टक्के लाभाऊंश देण्याचा मानस आहे, तसेच ५५० मराठा तरुणांना ५० कोटीचे कर्ज वाटप केल्याचे पाटील म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संचालक आनंदा पाटील, सर्जेराव पाटील ,नामदेव मोळे, भगवान सूर्यवंशी, संभाजी नंदीवाले, आनंदा जांभीलकर,सुभाष पाटील,उत्तम पाटील, प्रकाश देसाई सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील, उपस्थित होते.