नवीन तीन शाखात   फर्निचरसाठी लाखो रुपयांचा चुराडा : अमर पाटील शिंगणापूरकर यांची टीका ( आडूर,कळंबे,भामटे परिसरात  राजर्षी शाहू संस्थापक पँनेल प्रचार सभा )

कोल्हापूर :

बँकेने घाईगडबडीत भाड्याच्या जागेत ज्या तीन नवीन शाखा सुरू केल्या त्या शाखांच्या फर्निचरसाठी ७८ लाख रूपये खर्च केले. ही बीले संचालक मंडळाच्या शेवटच्या बैठकीत घाईघाईने मंजूर केली. अशा हुकूमशाही पद्धतीने  अध्यक्ष बँक वाचवणार  आहेत  कां? असा सवाल करत नवीन तीन शाखात   फर्निचरसाठी लाखो रुपयांचा चुराडा केल्याची टिका  अमर पाटील शिंगणापूरकर यांनी केली. 

  आडूर,कळंबे,भामटे,चिंचवडे गावातून राजर्षी शाहू संस्थापक पँनेल प्रचार सभा घेण्यात आल्या. यावेळी अमर पाटील यांनी सत्तारूढ गटाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. 

 प्रा. बी.बी. पाटील म्हणाले,  आसुर्ले शाखेची इमारत १० लाखात बांधून पूर्ण झाली आणि फर्निचरवर मात्र ३० लाख खर्च झाला. कारभार चांगला केला म्हणून सांगणाऱ्या अध्यक्षासह,संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांवर कारवाई करण्याचा अहवाल शासकीय चौकशी अधिकाऱ्याने देऊन तुमच्या कारभाराचा पंचनामा केला आहे.बँकेसाठी  राजर्षी शाहू संस्थापक पँनेल हा एकच पर्याय आहे. अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!