मरळी गावातून संस्थापक सत्तारूढ पॅनेलला ७०% मतदान देणार : माजी सरपंच हंबीरराव चौगले मरळीकर यांनी दिला ठाम विश्वास
कोल्हापूर :
सात वर्षापूर्वी यशवंत बँकेतून मरळी म्हंटले की सहजासहजी कर्ज द्यायला तयार नव्हते. कुवत असतानाही गावातील लोकांची कर्जे नाकारली.माझ्यासह गावातील अनेकांचा तो अनुभव आहे. मात्र एकनाथ पाटील चेअरमन झाल्यावर जाईल त्याची कर्ज प्रकरणे होऊ लागली. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हटले पाहिजे.गावातील आताची सर्व कर्ज प्रकरणे ही एकनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. त्यातील कोणीही थकीत नाहीत. याची जाण कर्जदार व सभासद निश्चितच ठेवतील. मरळी गावातील सभासदांचा संस्थापक सत्तारूढ पॅनेलला पूर्ण पाठिंबा आहे. गावातून ७०% मतदान या पॅनेलला देऊ असा ठाम विश्वास माजी सरपंच हंबीरराव चौगले मरळीकर यांनी दिला..
मरळी ता. करवीर येथील संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव गुरव होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवास पाटील सर म्हणाले , बँकेकडे व्यवसाय दृष्टीने पाहिले तरच बँक नफ्यात चालते. आम्ही गेली सहा वर्षात संचालक मंडळात आहे. कर्जाच्या व्याजाचा दर कमी केला त्यामुळे थकीत प्रमाण कमी झाले. बँकेत राजकारणविरहित कारभार केला आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक हजार मराठा युवकांना व्यवसायिक बनविले आहे. हे सर्व जण कर्ज वेळेत फेडत आहेत. सभासदना १५ टक्के डीव्हीडड दिला जो सर्वात जास्त आहे. स्पर्धेच्या युगात ई बँकिंग सुविधा आणली. याच्या पूर्वी कोणी काय केले सर्वांना माहीत आहे. आम्ही येणाऱ्या प्रत्येकाला बँकेत चहा देऊन स्वागतच केले. हा पाहुणचाराचा संस्काराचाच भाग आहे. सभासदाना दिलेला चहा कोण काढेल काय? ग्रामीण भागातील सर्वांना हक्काने कर्ज उपलब्ध करून देणारी बँक म्हणून प्रत्येकाचे मनात यशवंत बँक घर करून राहिली आहे. बँकेच्या प्रगतीशील वाटचालीस आपले पाठबळ मिळावे.
हिंदुराव तोडकर वाकरेकर म्हणाले, जुन्या नव्याचा मेळ घालून आपणांसमोर आलो आहोत. सहा वर्षात बँकेच्या हिताला प्राधान्य दिल्याने , व्यावसायिकता पाहिल्यानेच बँकेची भरभराट झाली आहे. बँकेत येणाऱ्या कोणत्याही सभासदाच्या कामाला डावलले नाही. जेवढे म्हणून अडचणीच्या वेळी सभासदाना न्याय देता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न केला आहे. सभासदांचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल यात शंका नाही.
महिला उमेदवार शारदा ढेरे (नागदेववाडी) व पल्लवी अभिजित पाटील (सडोली दुमाला ) म्हणाल्या, सभासदच्या अडचणी, दुःख पाहून ते दूर करण्यासाठी एकनाथ पाटील यांनी ताकदिने कर्ज पुरवठा करून त्याचे दुःख दूर केले. अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्या एकनाथ पाटील व त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना मदत करा. आमच्या सत्याच्या बाजूने राहावे.
उमेदवारांची ओळख सुधाकर देसाई करून देत त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलेल्या कामाचे दाखले देत सभासदाना भावनिक साद घातली. सभेला यशवंत बॅंकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर विकास संस्थेचे चेअरमन बंडा पोवार, आर. जी.पाटील, माजी उपसरपंच टी.एम.पाटील, श्रीकृष्ण दूध संस्थेचे चेअरमन पै. दादू पाटील, जोतिर्लिंग दूध संस्थेचे चेअरमन नामदेव पाटील, भगवान तळसकर, आदी पदाधिकारी, पॅनेलचे सर्व उमेदवार, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.