यशवंत बँकेसाठी ७०.०४%  मतदान : उद्याच्या निकालाकडे लक्ष

कोल्हापूर : श्री  यशवंत सहकारी बँक कुडीत्रे ची पंचवार्षिक निवडणूक प्रचारातील आरोप – प्रत्यारोपानी, निवडणूक रणधुमाळीमुळे बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यन्त चुरशिची बनली. बँकेचे विद्यमान चेअरमन एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल (कपबशी)विरुद्ध अमर पाटील शिंगणापूरकर व ऍड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल (अंगठी) अशी दुरंगी लढत झाली. आज रविवारी झालेल्या मतदान दिवशी सर्वत्र शांततेत ७०.०४ % मतदान झाले. उद्या सोमवारी मतमोजणी होणार आहे. 

कार्यक्षेत्रातील  ४२ केंद्रांवर मतदान झाले.  श्रीराम हायस्कूल कुडीत्रे  येथील केंद्रावर सर्वाधिक मतदान झाले. बँकेच्या २१ जागांसाठी उमेदवार रिंगणात होते. बँकेचे १८०२७ सभासदापैकी १२६२७ सभासदांनी मतदानांचा हक्क बजावला.  निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे  यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. 

यावेळची निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता निवडणूक कमालीची अटीतटीची बनली. उद्या सोमवारी (दि. २५) मतमोजणी होत असून निकाल कुणाच्या बाजूने कपबशीच्या की अंगठीच्या बाजूने लागतो याची उत्सुकता ताणली गेली आहे. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!