सभासदच त्यांना सत्तेवरून खाली खेचतील : अमर पाटील शिंगणापूरकर ( कोगे येथे राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलची सभा )
कोल्हापूर :
गेल्या ४३ वर्षांत बँकेची कोणतीच आर्थिक प्रगती झाली नाही.आपणच सात वर्षांत बँकेची दुप्पट प्रगती केली म्हणून स्वतः ची पाठ विद्यमान चेअरमन थोपटून घेत आहेत. मात्र बँकेत बसून बँकेपेक्षा स्वतः चा व्यवसाय करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील. सभासदच त्यांना सत्तेवरून खाली खेचतील. पब्लिक लिमिटेड होणारी बँक सभासदांच्या मालकीची राखायची असेल तर संस्थापक पॅनेलला निवडून द्या, असे आवाहन विरोधी आघाडीचे नेते अमर पाटील शिंगणापूर यां नी केले.
कोगे ता करवीर येथे राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या झाळेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
अमर पाटील म्हणाले, मुख्य शाखेची टोलेजंग इमारत, दहा शाखांचा विस्तार तुमच्या काळात झाला नाही, तो पूर्वीच्या संचालक मंडळाने केला आहे. स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेण्यात अध्यक्ष मग्न आहेत. नवीन शाखा फर्निचर खर्च तुम्ही नाकारत असला तरी आम्ही व्हाउचरसहित खर्चाचा पुरावा द्यायला तयार आहे. मुख्य शाखेची टोलेजंग इमारत, दहा शाखांचा विस्तार तुमच्या काळात झाला नाही, तो पूर्वीच्या संचालक मंडळाने केला आहे.
प्रकाश देसाई म्हणाले, मनमानी कारभार करताना अध्यक्षांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. जागा खरेदी, नवीन शाखांत फर्निचर खर्च याचा बाजार मांडला. त्यांना मतदार नक्की जागा दाखवतील.
यावेळी सभेला कुंभीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, संचालक संजय पाटील, सरपंच रणजित पाटील, सर्व उमेदवार, सभासद उपस्थित होते.