करवीर :
ऐतिहासिक वारसा लाभलेला कसबा बीड (ता.करवीर) येथील प्राचीन महादेव मंदिर, लक्ष्मी तलाव, गणेश तलाव या ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
पाहणी केली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे – भामरे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गावातील सर्व प्राचीन शिलालेख, वीरगळ एकत्रित करून वीरगळ पार्क साकारण्याचा मनोदय व्यक्त केला तसेच प्राचीन तलाव परिसरातील अतिक्रमणे रोखण्याची सूचनाही केली. ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून द्यावा, त्यानुसार हा वारसा जतन करण्यासाठी निधी देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी अध्यक्षा डॉ. अमरजा निंबाळकर, यंग बिग्रेड सुवर्ण राजधानी तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक राजाराम वरुटे, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पांडुरंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन अमित वरुटे, तलाठी एन.पी.पाटील, सर्कल प्रवीण माने, डी. एम. सूर्यवंशी, प्रकाश तिबिले, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशीलदार, सचिन वरुटे आदी उपस्थित होते.