राधानगरी धरणाचा सकाळी उघडलेला मुख्य दरवाजा सहा तासांनी बंद करण्यात यश आले आहे.
राधानगरी :
राधानगरी धरणाचा सकाळी नऊ वाजता उघडलेला मुख्य दरवाजा सहा तासांनी बंद करण्यात यश आले आहे.
पाच हजार क्युसेक्स या हिशेबाने जवळपास १६० दशलक्ष घनफूट पाणी बाहेर पडल्याचा अंदाज आहे. धरणाची पाणी पातळी आता दुपारपर्यंत १ फुटांनी कमी झाली आहे.
राधानगरी धरणाचा आज मुख्य दरवाजा उघडून अडकला होता ,यामुळे नदी पात्रात सुमारे 5 हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.