पत्रकार परिषद
करवीर :

खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2021 मधून
वाकरे ग्रामपंचायतीला नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 49 लाख 96 हजार रुपयेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे , जिल्हा परिषद व तसेच ग्रामपंचायत १५ वित्त आयोग निधीमधून सर्व प्रशासकीय कार्यालय सौर ऊर्जेखाली येणार असून सौर ऊर्जेमुळे ग्रामपंचायतीची वर्षाला सुमारे १२ लाखाची बचत होणार आहे. जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत सौरऊर्जा प्रकल्पातून समृद्ध होणार असल्याची माहिती
सरपंच वसंत तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसरपंच शारदा पाटील , माजी उपसरपंच कुंडलीक पाटील ,सर्व सदस्य, ग्रामसेवक संभाजी पाटील, ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सरपंच तोडकर म्हणाले, गावची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजनेचा,व इतर विजेचा खर्च सुमारे बारा लाख आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम होत होता , परिणामी विकासावर परिणाम होत होता . या सर्वाचा अभ्यास करून खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2021 मधून या योजनेतून वाकरे ग्रामपंचायतीला 49 लाख 96 हजार रुपयेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये शंभर किलो वॅट वीज निर्मिती होणार असून यामधून नळ पाणीपुरवठा योजनेचा २० एचपी विद्युत पंप चालणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालय साठी लागणारी ३६ किलो वॅट वीज निर्मिती साठी निधीचे नियोजन १५ वित्त आयोग मधून केले आहे . यामधून प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, ग्रामपंचायत कार्यालय,चावडी , अंगणवाडी, समाज मंदिर बोरवेल , अशी ग्रामपंचायतीचे कार्यालय सौर ऊर्जा प्रकल्प खाली येणार आहेत. यामुळे विजेची बचत होऊन सुमारे १२ लाखाची ग्रामपंचायतीची बचत होणार आहे. या पैशातून अन्य विकास करता येईल असे सरपंच यांनी सांगितले . प्रकल्प मंजुरीसाठी, पालकमंत्री सतेज पाटील ,जिल्हाधिकारी दौलत देसाई ,जिल्हा नियोजन समिती अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व यांत्रिक विभाग, महाऊर्जा अधिकारी, यांनी तांत्रिक कामात मदत केली आहे .अशी माहिती यावेळी सांगण्यात आली आहे .