अज्ञातांनी लावली आग
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाघजाई डोंगरात अज्ञातांनी वणवा पेटविला. यामध्ये सुमारे दहा एकरातील जैवविविधता जळून खाक झाली, यामुळे पर्यावरणाची हानी झाली. या आगीत गवत, झाडे झुडपे, पशु पक्ष्यांची घरटी, जळावू लाकूड ,आणि शेतकऱ्याचा ऊस पेटला आहे.दरम्यान पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून दोन तास आग विजवण्यासाठी धडपड केली, रात्री दरीत उतरून तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. या प्रकाराबद्दल अज्ञाताच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पन्हाळा,आणि करवीर तालुक्याच्या सीमेवरील ऐतिहासिक वाघजाई डोंगर आहे. गेली अनेक वर्ष यात्रेला अज्ञातांकडून डोंगर पेटवला जात होता. याबाबत येथील तरुणांनी वाघजाई संवर्धन समिती स्थापन करून गेली दोन वर्ष डोंगर पेटू न देण्याचे यशस्वी काम केले आहे.

नुकतीच साध्या पद्धतीने यात्रा झाली आहे. दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पूनाळ, मरळी खिंडी परिसरातून अज्ञातांनी आग लावल्यानंतर डोंगर पेटू लागला, ही माहिती डोंगरावर झाडांना पाणी घालण्यासाठी गेलेले ज्योतीराम पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने चिंचवडे येथील निखिल तडूलकर ,प्रकाश पाटील, भामटे येथील जयंत पाटील यांना सांगितली, त्यानंतर मरळी येथील आणखी चार कार्यकर्ते यांनी सहा वाजता डोंगरात धाव घेतली.
आणि आग विजवण्यासाठी सुरुवात केली.साडेआठ वाजेपर्यंत दरीत उतरून जीव धोक्यात घालून या तरुणांनी शर्तीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली.
दरम्यान या आगीत सुमारे दहा एकरातील डोंगर व जैवविविधता पेटून खाक झाली. त्यामध्ये कापलेले गवत, रचलेल्या गंज्या पेटल्या, जळाऊ लाकूड पेटले, ओली झाडेझुडपे पेटली, पशु पक्षांची घरटी पेटली,दरीच्या दिशेने आग झेपावत गेली,आणि मरळी येथील एका शेतकऱ्या चा सुमारे एक एकर ऊस पेटला. पाईपलाईन जळाली, यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
____________
ज्योतीराम पाटील निसर्गप्रेमी युवक,
अज्ञातांनी सायंकाळी सहा नंतर आग लावली. आठ तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा वाऱ्यामुळे आग वाढत जाऊन रात्रभर शेकडो एकर डोंगर पेटला असता. डोंगर पेटून पर्यावरणाची हानी होत आहे.