कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील
वाहतूक साडे आठ वाजता सुरळीत सुरू झाली
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक पाच तास ठप्प
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली.साडेतीन वाजता झाड पडले साडेआठ वाजता झाड हटवण्यात आले, सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली. करवीर पोलीसानी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली, आपत्ती व्यवस्थापन, आणि नॅशनल हायवे खात्याचे कर्मचारी यांनी झाड हटवण्यासाठी प्रयत्न केले.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली .
दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.
दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक पाच वाजता दाखल झाले, साडे पाच तास झाड तोडणी यंत्राद्वारे झाड कटिंग करण्याचे काम सुरू होते, जेसीबीची साह्याने कटिंग केलेले झाड रस्त्याच्या कडेला लावण्यात येत होते. यातच साडेसहा वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता,
वडाचे शंभर वर्षाचे झाड होते, यामुळे तोडणी यंत्राचे ब्लेड चालत नव्हते. परिसरात वीज खंडित झाल्यामुळे अनेकांचे मोबाईल बंद होते, यामुळे संपर्क साधने अवघड झाले. एसटी ,अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पाच तासाच्या प्रयत्नानंतर रात्री साडे आठ वाजता झाड बाजूला करण्यात आले, यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
दोनवडे येथे झाड पडून वाहतूक ठप्प झाली होती, पाडळी खुर्द येथे दत्तात्रय पाटील यांच्या घरावर नारळाचे झाड पडले,आणि पत्रा व छप्पर याचे नुकसान झाले. दोनवडे येथील सुरेश मारुती पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून गेले.