नेपाळ पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या एका प्रवाशी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला : बेपत्ता झालेल्या विमानात ४ भारतीय
Tim Global :
नेपाळ पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या एका प्रवाशी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते. दोन तासांपासून हे विमान रडारवरून बेपत्ता झालं आहे, याबाबतची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विमानाचा संपर्क तुटल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता झालेल्या विमानात ४ भारतीय नागरिकांसह दोन इतर परदेशी नागरिक आहेत. तर उर्वरित सर्व प्रवाशी हे नेपाळ देशाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेल्या विमानाने रविवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान रडारमधून गायब झालं आहे. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी एक खासगी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं आहे. तसेच नेपाळ पोलिसांनी देखील शोधमोहीम सुरू केली आहे.