गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले
आमदार विक्रमसिंह सावंत
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्यातील सहकारातील पहिल्या क्रमांकाच्या गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. त्यातून पारंपारिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे.
याचा राज्यातील इतर दूध संघांनी आदर्श घ्यावा असे गौरोद्गार जत मतदार संघाचे (सांगली) येथील आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी आज गोकुळच्या ताराबाई पार्क ऑफिस मध्ये भेट दिली असता काढले.
यावेळी दूध संघाच्या संकलन ,मार्केटींग,पशुसंवर्धन या विषयावर आमदार विक्रमसिंह सावंत व संघाचे चेअरमन श्री. विश्वासराव नारायण पाटील आबाजी यांच्यात चर्चा झाली.
त्यांचे स्वागत गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. श्री. विश्वासराव नारायण पाटील आबाजी व संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनी केले.
यावेळी जत दूध तालुका संघाचे संचालक युवराज निकम,धैर्यशील सावंत, अतुल मोरे,काका शिंदे व गोकुळचे अधिकारी उपस्थित होते.