ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी :
एकनाथ पाटील यशवंत बँक अध्यक्ष
यशवंत बँकेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर :

ग्रामीण भागातील विध्यार्थी शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उतुंग यश मिळवत आहेत. विद्यार्थांनी मिळवलेले यश पाहून गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नसून परिश्रमातून गुणवत्ता तयार होते, असे प्रतिपादन यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केले.यशवंत सहकारी बँकेत दहावी व बारावी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावी व बारावीची वर्षे नवीन वळण देणारी असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थांनी सर्वाधिक गुण संपादन करून जिल्हा व राज्यस्तरावर यश संपादन केले आहे.गुणवत्तेला अधिक महत्व दिले पाहिजे. प्रामाणिक कष्ट म्हणजे गुणवत्ता असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर, संचालक सर्जेराव पाटील, बाजीराव खाडे, नामदेव मोळे, पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील , प्रकाश देसाई, सुभाष पाटील, उत्तम पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील, संग्राम भापकर, भगवंत सूर्यवंशी, आनंदा पाटील, दादासाहेब पाटील, युवराज कांबळे, संभाजी नंदीवाले, स्नेहलता पाटील, राजश्री भोगांवकर, आनंदराव जांबीलकर, सुरेश अपराध, राजेंद्र पाटील, निवास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील उपस्थित होते.