वडणगेत दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
मोफत पुस्तक पेढी अंतर्गत दहावी पुस्तकांचेही वाटप
कोल्हापूर :
वडणगे येथील बी.एच.दादा प्रेमी युवक मंच ₹च्या वतीने सलग आठव्या वर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मोफत पुस्तक पेढी अंतर्गत पुस्तके वाटप तसेच नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ माण्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
देवी पार्वती हायस्कुल , जोतिर्लिंग हायस्कूल तसेच इतर हायस्कुल मधील प्रथम चार क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आरोग्य मित्र शेवगा तसेच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या बरोबरच सलग आठव्या वर्षी गावातीलच इयत्ता दहावीच्या गरजू व होतकरू विध्यार्थ्यांना मोफत पुस्तक पेढी या उपक्रमा अंतर्गत पाठ्यपुस्तके देण्यात आली .
सदरचा समारंभ आंबेवाडी गावचे जेष्ठ नेते एम. जी. पाटील (बापू) यांच्या शुभहस्ते कु.श्वेता बराले, कु. भक्ती मुदगल, कु.समीक्षा बराले ,कु. जय देवणे, कु. तन्वी पाटील ,कु. रेवती मोरे ,कु.आर्या जौंदाळ ,कु.सृष्टी बराले, कु. दिशा पाटील या दहावी गुणवंत विद्यार्थांचा सक्तार करण्यात आला .
यावेळी एम. जी. पाटील यांनी मंच च्या पुस्तक पेढी उपक्रमाचे कौतुक करत जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे अवाहन करत दहावीच्या गुणवंत विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
युवा नेते रविंद्र पाटील यांनी युवक मंच विध्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती यावेळी देऊन अकरावीच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते बी.एच.पाटील(दादा) होते तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये चेअरमन सुनील लांडगे, विठ्ठल माने, भगवान चौगले, बी.आर. पाटील,मुख्याध्यापीका श्रीमती आर. पी .पाटील,मुख्याध्यापीका सौ .एस. पी. बन्ने, निवास बराले,बजरंग बराले, शहाजी साखळकर, पिराजी मेथे, पोपट चौगले, तसेच ग्रामस्थ ,पालक व विध्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रस्तावीक हरीष तेलवेकर सर यांनी तर आभार सुधीर होनखांबे यांनी मानले तर सूत्रसंचालन आर.बी.देवणे सर यांनी केले.