मुंबई  :

अंदमान समुद्रात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे . त्याचे सोमवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात २४ व २५ मे रोजी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरी पडत आहेत. पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळात रूपांतर झाल्यावर २६ मेला ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून ५६० किमी अंतरावर होते. ओडिशातील पारादीपपासून ते ५९० किमी आणि बालासोरपासून ६९० किमी दूर आहे. तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किमी अंतरावर होते. सोमवारी सकाळी या कमी दाबाच्या क्षेत्राचे यास चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर पुढील २४ तासात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.

त्यानंतर २६ मे रोजी त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ते पश्चिम बंगालमधील सागर आणि ओडिशाच्या पारादीप दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर बिहार, झारखंडपर्यंत त्याचा प्रवास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!