Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक
मुंबई :
Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली. यानुसार २ जूनला विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. ९ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. तसेच या १० जागांसाठी २० जूनला मतदान होईल.
सुभाष देसाई, प्रविण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील मुदत संपत आहे. या जागांवर निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या १० जागांपैकी ५ जागा भाजपाच्या आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला ४ जागाच निवडून आणता येतील.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम
नोटिफिकेशन – २ जून २०२२उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२अर्जांची छाननी – १० जून २०२२अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२मतदानाचा दिवस – २० जून २०२२मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)