मुसळधार पावसामुळे भोगमवाडी येथे वीटभट्टी, विहीर, भाताचे मोठे नुकसान
करवीर :
भोगमवाडी (ता.करवीर) येथील
शामराव तुकाराम भोगम यांची निम्मी वीटभट्टीच
मुसळधार पावसामुळे भोगमवाडी ते तेरसवाडी दरम्यानच्या ओढ्याच्या पाण्याने वाहून गेली आहे. यामध्ये सुमारे पंधरा ते वीस हजार विटांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या परिसरातील भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे ओढ्यावरील वाहतुकीचा रस्ता खराब झाला असून पावसाचे वाहून येणारे पाणी ओढा उलटून आजूबाजूच्या शेतातून वाहू लागले. यामध्ये वीटभट्टीचे नुकसान झाले आहे. शिवाय भात रोपे वाहून गेली असून अनेक ठिकाणी गाळाने माखली गेली आहेत. शामराव भोगम, बळवंत पाटील,कृष्णात पाटील, नाथाजी बाटे या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरूर पिके धुवून गेली आहेत. सागर ढेरे यांच्या विहिरीत ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह जाऊन विहीर बुजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.