हसन मुश्रीफांचे ते विधान म्हणजे अतिशयोक्तीचा कळस.. ज्येष्ठ संचालक अरुण नरके
सत्ताधारी आघाडीच्या २१ पैकी २१ जागा निवडून येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर :
गोकुळची यावेळची निवडणूक म्हणजे फाईट आहे. ती एकतर्फी नक्कीच नाही. गोकुळ हा देशातील उत्कृष्ट चाललेला संघ आहे. या निवडणुकीत फक्त अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे , असे मंत्री मुश्रीफ यांनी केलेले वक्तव्य म्हणजे अतिशयोक्तीचा कळस आहे. अशी टीका करत सत्ताधारी गटाने चांगला कारभार केला आहे. दूध उत्पादक सगळे जाणून आहेत. सत्तारुढ गटाचे २१ पैकी २१ उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

अरुण नरके पुढे म्हणाले, नेत्यांनी संघाच्या कारभारात कधीही दबाव टाकला नाही. संघाने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ दिला आहे. ४०० कोटींच्या ठेवी असणारा हाएकमेव संघ आहे. यामुळेच प्रत्येकालाच हा दूध संघ आपल्या ताब्यात असावा असे वाटते. म्हणून गोकुळसाठी अनेकांच्या उडया पडतात. आमदार, खासदार , मंत्रीच काय राज्य सरकारही गोकुळ पाहिजे झाला आहे . मात्र गोकुळ दूध संघ हा राजकारणविरहित चालला पाहिजे.
चेतन नरके यांचे काम बाप से बेटा सवाई म्हणतात ना तसे आहे. गोकुळ जागतिक पातळीवर पोहचला पाहिजे अशी त्यांची विचारधारा आहे. सत्ताधारी गटाने गोकुळचा कारभार उत्कृष्ट केला आहे. सभासदांचे हित जोपासले आहे. बाहेरून टीका करणे सोपे असते , असा टोला विरोधकांना लागावत , गोकुळच्या या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.