वैयक्तिक लाभाच्या
योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन : पशुसंवर्धन विभाग

कोल्हापूर : 

दुधाळ गाई -म्हैशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्यातील पशुपालकांना, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

  विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/नवबौध्द लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप  63 हजार 796 च्या मर्यादेत तसेच  77 हजार 659 च्या मर्यादेत 10+1 शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.

  जिल्हा वार्षिक योजना एकात्मिक कुक्कट विकास कार्यक्रमांतर्गत 100 एक दिवसीय मिश्र कुक्कुट पिलांचा गट व खाद्य अनुदानासाठी  6 हजार रुपये दोन टप्प्यांमध्ये देण्यात येत असून ही योजना सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे.

  जिल्हा आदिवासी घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 63 हजार 796 च्या मर्यादेत 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच 77 हजार 659 च्या मर्यादेत 10+1 शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ- https;//ah.mahabms.com ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव- AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध, अर्ज करण्याचा कालावधी- 18 डिसेंबर पर्यंत आहे. टोल फ्री क्रंमाक-1962 किंवा 1800-233-0418 असा आहे.

              योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दत याचा संपुर्ण तपशिल संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जाणार आहेत. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

  पशुपालकांनी अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत मोबाईल क्रमांक बदलू नये. तसेच अर्ज भरण्याकरिता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.  योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  यांच्याशी संपर्क साधवा, असे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!