आयुष्यातील साठवलेली 20 लाखाची पूंजी केली दान
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीसाठी दिले २० लाख रूपये
कोल्हापूर :
ज्या शाळेत शिकून आपण मोठे झालो,उद्योगपती झालो,त्या शाळेकडे आपण मागे वळून पाहिले पाहिजे ,या शाळा टिकल्या पाहिजेत,गरीब विध्यार्थी शिकला पाहिजे या उदात्त भावनेने एका माजी विद्यार्थ्यांने
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीसाठी तब्बल २० लाख रूपये दिले आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे .

जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी माळवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे.या प्राथमिक शाळेत कृष्णात खोत यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. . कोतोली पैकी माळवाडी येथे महाविद्यालय शिक्षणाचीही सोय आहे. जिल्हा परिषद शाळेत सात वर्ग असूनही शाळेची इमारत मात्र अत्यंद दयनीय अवस्थेत होती.रोज शाळेसमोरून जाताना इमारतीची अवस्था बघून खोत अस्वस्थ होत असे . ज्या शाळेत शिकून आपण मोठे झालो,उद्योगपती झालो त्या शाळेची अवस्था त्यांना बघवत नसे.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यावर तर त्यांना इमारतीची खंत नेहमीच लागून राहीली,
माळवाडी शाळा गुणवत्तधारक आहे.क्रीडा क्षेत्रातही नाव आहे.कृष्णात खोत यांनी आपल्या सामाजिक कार्यामुळे जे नाव कमविले होते त्याच्या जोरावर एम्पथी फौंडेशनशी संपर्क साधला.शाळेची गुणवत्ता पाहून एम्पथी फौंडेशन मदतीस तयार झाली.पण गावानेही काही रक्कम उभी करणे आवश्यक असल्याने एक कोटी रूपयांच्या इमारतीसाठी कृष्णात यांनी २० लाख रूपये आपल्या शाळेसाठी दिले आहेत.
एक कोटी रूपयांची प्रशस्त दुमजली जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कृष्णात खोत, ग्रामस्थ ,शिक्षक व एम्पथी फौडेशनच्या मदतीतून उभारली आहे .
२० लाख रूपये तुम्ही जिप शाळेला का देता ? असे विचारता के पी खोत म्हणाले,” शासनाची मदत मिळणे फारच अडचणीचे होते.या जिप शाळेचे माझ्यावर खूप उपकार आहेत. माझ्यासह अनेक गोरगरीबांची मुले इथं शिकून त्यांची भरभराट झाली आहे.या पिढीतील शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणात कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणूनच आयुष्यातील साठवलेली पूंजी दान केली.
शाळेची इमारत पूर्ण होताच स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज ग्रंथालय उभे करणार असून अद्ययावत संगणक कक्ष उभारणार असल्याचे कृष्णात खोत यांनी सांगितले आहे.