आताच : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतुकीची कोंडी फुटली ,वाहतूक सुरळीत
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती, काही सामाजिक तरुणांनी
ट्रॅक्टर ट्रॉली ऊस बाजूला केला तब्बल दोन तासाने वाहतूक सुरळीत झाली आहे.

बालिंगा पुलाजवळ रस्त्यात उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवित आणि घटना घडलेली नाही, यामुळे सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
समाजसेवक अनिल घराळ, वाहक जितेंद्र इंगवले,एस ए पाटील, प्रमोद दिवसे, काही समाजसेवक यांनी ट्रॉली ऊस बाजूला घेण्याचे कार्य केले.