गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. शिरोली दुमालात बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप
करवीर :
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणरायाला करवीर मधील गावागावात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. ‘ गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला..’ या जयघोषानी सारा परिसर दणाणून गेला होता.
मागील आठवड्यात गणरायाचे आपल्या घरी आगमन झाले आणि सर्वत्र चैतन्याचे, भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गेली अकरा दिवस घरच्या गणरायाची मनोभावे पूजा केली. श्रद्धेने जोपासना केली आणि बघता बघता गणरायाला निरोप देण्याचा दिवस उजाडला.आज अनंत चतुर्थीचा दिवस सर्वत्र आनंदमय वातावरणात गणरायाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, असा जयघोष ऐकायला मिळत होता.
शिरोली दुमाला गावातील हनुमान मंदिर येथे गावातील सर्व लोक गणेश मूर्ती घेऊन एकत्र आले. रितीरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा झाली व टाळ मृदंगाच्या तालात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अतिशय भक्तिमय वातावरणात लोकांनी गणरायाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.