कोल्हापूर :
वेळ वाचवण्यासाठी ऊर्जा, इंधन, पाणी या संसाधनांचा अति आणि गैरवापर सर्वत्र सुरु आहे. आधुनिक जगात जीवन जगत असताना सर्व प्रवर्गातील लोक हे दैनंदिन जीवनात वैद्यनिक उपकरणांचा वापर करत असतात. सर्व कामे अगदी सोईस्कर होण्यासाठी हल्ली अनेक उपाय केले जातात. परंतु या गोष्टी शिस्तबद्ध आणि योग्य पद्धतीने केल्यास संसाधनांचा गैरवापर टाळण्यासाठी मदत होऊ शकेल.यंदाचा राष्ट्रीय विज्ञान दिन हा घरीच राहून पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचे महत्व समजून घेऊन साजरा करणे गरजेचे आहे. या उपक्रमामध्ये घरातील सर्व सदस्यांनी सहभागी होऊन उत्साहाने विज्ञान दिन साजरा करावा असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
घरगुती वैज्ञानिक प्रयोग
1) सौर ऊर्जेचा वापर :-
उन्हाळी पदार्थ वाळविणे, टिकविणे यासाठी काळ्या रंगाच्या कागदाचा वापर केल्यास ते लवकर वाळतात.
सौर वाळवणी यंत्र :- अन्नपदार्थ शिजवणे, उकडणे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, आवळ्याचे पदार्थ, रवा, शेंगदाणे, डाळी इत्यादी गोष्टींसाठी सौर चुलीचा वापर होऊ शकतो.
सौर दिवा :- सौर ऊर्जेचा वापर सध्या विजनिर्मिती करिता केला जात आहे. आपण घरच्याघरी सुद्धा सौर दिवा तयार करून त्याचा वापर करू शकतो. यामुळे वीजेची बचत होते.
2) शून्य ऊर्जा शीतकरण यंत्र (मातीचा व विटेचा फ्रीझ) :- उन्हाळा सुरु होत आहे. उष्ण वातावरणामध्ये भाजीपाला, शेतीमाल जास्त दिवस टिकवण्यास मदत होते.
3) वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करणे .
घर परिसरातील, बागेतील कचऱ्यापासून कपोस्ट खताची निर्मिती करणे.
उरलेल्या खरकट्या अन्नपादार्थापासून बायोगासची निर्मिती करणे.
नारळाच्या शेंडीचा पुनर्वापर करणे. उदा. भांडी घासण्याचा चोथा, विविध सुशोभित वस्तू, कोको पीट तयार करणे.
निर्मल्य पाण्यात न टाकता ते सुकवून त्यापासून रंगनिर्मिती करणे.

लिंबू, संत्री, मोसंबी, कडुलिंब, निगड्डी याच्या साली व पाने सौर ऊर्जेचा वापर करून वाळवून याचा वापर फेस पॅक, टॉयलेट व फरशी क्लिनर तयार करण्यासाठी करून वापरणे. तसेच बागेतील किंवा कुंडीतील झाडांवर कीड पडली असेल तर घरच्याघरी जैविक कीड नाशक म्हणून वापर करणे.
4) वैज्ञानिक पद्धतीने बी रुजवणे व कुंडी भरणे.
5) आपल्या घरातील वीज वापराचे लेखपरीक्षण करणे व जास्तीतजास्त LED दिव्यांचा वापर करणे.
6) आपल्या घरातील LPG वापराचे लेखापरीक्षण करणे.
गॅस ची ज्योत भांड्यापेक्षा जास्त नसावी.
शिजवण्याचे पदार्थ भिजवून ठेवावेत.
शक्य तितके पदार्थ झाकून शिजवावेत.
पदार्थ शिजवताना गरजेपुरते पाणी घालून शिजवावेत.
चहा, कॉफी सारखे पदार्थ एकदाच उकळून थर्मास मध्ये भरून ठेवावेत.
अधिक माहितीसाठी
निसर्ग मित्र, कोल्हापूर
अनिल चौगुले.
2823/48 महालक्ष्मी नगर, सुभाष रोड, कोल्हापूर.
मो. नं. 9423858711
व्हाट्सअँप. 9860507873
Email id. anilchoug11@gmail.com