मुंबईला जाताय हे वाचा : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची गर्दी
मुंबई :
ख्रिसमस आणि नवीन वर्ष यामुळे राज्यभरातील पर्यटक विविध पर्यटनस्थळांकडे निघालेले आहेत.यामुळे मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची गर्दी झाली असून, वाहतूकीची कोडीं झाली आहे. त्यामुळे खालापूर टोल नाका ते लोणावळा परीसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत, सुमारे १२ तासांहून अधिक तास या परिसरात वाहतूक संथ गतीने सुरु होती.
नाताळमुळे मुंबई, ठाणे, नवीमुंबई परीसरातील नागरिक घराबाहेर पडले आहे. त्यामुळे महामार्गांवरील वाहनांची संख्या शुक्रवारी रात्रीपासून वाढण्यास सुरुवात झाली. खालापूर टोल नाका लोणावळा दरम्यान घाट परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अत्यंत धिम्या गतीने या परिसरात वाहनांची वर्दळ सुरु होती.
पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन सुरु होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने घाट परिसरातील कोंडी कमी होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून ते शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत या परिसरात अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे.