जीव धोक्यात घालून तरुणांनी पुरात अडकलेल्या वानरांना दिलेले अन्न
पाच तरुणांचे धाडसी कार्य
कोल्हापूर :
कुंभी ,भोगावती नदीचे पुराचे पाणी पात्राबाहेर आले आहे. या पुराच्या पाण्यात नदीकाठावर असलेल्या झाडांवर काही वानरांचा कळप पुरात फसला आहे. गेली तीन चार दिवस ही वानरे झाडावर अडकल्यामुळे भुकेने व्याकूळ झाली आहेत. आज कोगे तालुका करवीर येथील काही धाडसी तरुणांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मैल पोहोचत जाऊन या वानरांना अन्न दिले. तरुणांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार,
कुंभी ,भोगावती नदीच्या संगमाच्या ठीकाणी नदी काठावर झाडावर गेली ४ ते ५ दिवस ४ वानरे निवाऱ्यासाठी होतीत, पण अचानक झालेल्या पावसामुळे रात्री नदीचे पाणी पात्राबाहेर आले,यामुळे वानरे झाडावरच बरेच दिवस अडकून पडली आहेत.
शेतकरी प्रकाश घंगरगोळे हे जनावारांना चारा आणण्यासाठी गेले आसता त्याच्या निदर्शनास हा प्रकार आला, त्यांनी गावातील सहकाऱ्यांना ही घटना सांगितली, सहकाऱ्यांनी घरातील भाकरी व सणासाठी केलेल्या पोळ्या ,ब्रेड इ.अन्न घेवुन घटनास्थळी आले, पुराचे वाहते पाणी असताना वानरांसाठी धाडसाने तरुणांनी पुराच्या पाण्यात उड्या टाकल्या,यामध्ये
सचिन हारुगले , शंकर पाटील , प्रकाश घंगरगोळे, ऋतुराज फाटक आणि एस न्यूज चे चेतन मिठारी यांनी पुराच्या पाण्यात मैल अंतर कापून वानरांच्या झाडा पर्यंत जाण्यात यश मिळवले, झाडावर अडकलेल्या वानरांना आणलेला खाऊ दिल्यानंतर वानरांचा आनंद पाहून तरुणांना गहिवरून आले. या धाडसी तरुणांचे परिसरातून कौतुक होत आहे.