विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी अभिवादन
कोल्हापूर :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी कोल्हापूर येथे करवीरचे आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थित विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक सत्यजित पाटील, संजय गांधी कमिटी करवीर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शिवाजी कवठेकर, रणजित पाटील, सचिन चौगले यांच्यासह युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.