कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी गटाला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी.एन.पाटील, अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी अशी अत्यंत चुरशीची निवडणूक पाहायला मिळाली. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडीकांच्या गोकुळमधील सत्तेला सुरुंग लावला.
विजयी उमेदवार :
(विरोधी गट) राजर्षी शाहू शेतकरी आघाडी –
अरूण डोंगळे – 1980, अभिजित तायशेटे – 1972, अजित नरके – 1972, नविद मुश्रीफ – 1959, शशिकांत पाटील-चुयेकर – 1923, विश्वास पाटील – 1912, किसन चौगले – 1889, रणजित कृष्णराव पाटील – 1872, नंदकुमार ढेंगे – 1867, कर्णसिंह गायकवाड – 1848, बाबासाहेब चौगले – 1814, प्रकाश पाटील – 1709, संभाजी पाटील – 1721, अंजना रेडेकर – 1872, बयाजी शेळके, अमर पाटील, डॉ. सुजित मिणचेकर.
(सत्ताधारी गट) राजर्षी शाहू आघाडी –
अंबरिशसिंह घाटगे – 1803, बाळासाहेब खाडे – 1715,
चेतन नरके – 1762 व
शौमिका महाडिक – 1769.