राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटना कार्यालयाचा ७ वा वर्धापन दिन : संघटनेने बांधकाम कामगारांना उभे करण्याचे कार्य केले : आमदार पी.एन.पाटील
करवीर :
राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून
जवळपास 1500 पेक्षा जास्त कामगारांना संजय सुतार यांनी शासनाच्या विविध योजना व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने प्रयत्न झाले आहेत. संघटनेने बांधकाम कामगारांना उभे करण्याचे कार्य केले असल्याचे गौरवोदगार आमदार पी.एन.पाटील यांनी काढले.
पाडळी खुर्द (ता. करवीर ) येथील राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटना कार्यालयाचा ७ वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोगावती साखर कारखाना निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळविलेबद्दल आमदार पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सुतार म्हणाले, आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या आशिवार्दाने व सहकार्याने माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस बांधकाम कामगारांसाठी चांगले कार्य करू शकलो असे सांगून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कवठेकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे , आदीची मनोगते झाली. कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे सभापती भारत पाटील भुयेकर, पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर, चाफोडीचे सरपंच संध्या काशिद, बांधकाम कामगार कार्यालयाचे सर्व प्रतिनिधी , सदस्य व कर्मचारी, बांधकाम कामगार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिल्हा सचिव सुनिता सुतार यांनी व आभार विठ्ठल कोपार्डे यांनी केले.