करवीर :
वाकरे ता.करवीर येथील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी सरपंच कृष्णात तोरस्कर यांनी केली.मागणीचे निवेदन सरपंच वसंत तोडकर व ग्रामसेवक संभाजी पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात मागणी केल्या प्रमाणे,
वाकरे येथे सन २०१९/ २०,व सन २०/२१ वर्षांपासून पोवार गेली, पोवारवाडी ,शिंदे गल्ली ,सुतार गल्ली, दुकान गल्ली, व पाडळकर खोपडा येथील कुटुंबीयांना महापुराचा फटका बसला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने सर्वे केला आहे. कोरोना महामारी मध्ये रोजगार थांबला होता.असे दुहेरी संकट आलेने,वाकरे गावातील वरील भागातील कुटुंब आर्थिक अडचणीत सापडली आहेत.
त्या कुटुंबाची ग्रामपंचायतीने जबाबदारी उचलून, रेड झोन मधील पूर बाधित यांचा या वर्षाचा घरफाळा पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी माजी सरपंच कृष्णात तोरसकर यांनी केली आहे.यावेळी अमर करपे, भाग्यवान पाटील, आनंदा शिंदे, बाळासो पोवार, चंद्रकांत शिंदे, मारुती पाटील, शिवाजी पोवार, बाळू पोवार, तुकाराम पोवार ,उत्तम पोवार, गणेश पाटील, पांडुरंग पोवार,भिकाजी चौगले उपस्थित होते.