कोल्हापूरः
गोकुळचे वैभव हे उत्पादक, कर्मचारी, वितरक व ग्राहक या चार स्तंभावर उभे असून सर्वांच्या प्रामाणिक कार्यामुळे या वैभवामध्ये आणखीन भर पडत आहे, असे गौरवोद्गार चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले.
गोकुळ दूध संघाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी वर्षभरामध्ये संघाच्या विविध विभागामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कामगारांचा गुणवंत कामगार म्हणून सपत्नीक सत्कार तसेच “गोकुळश्री” स्पर्धेमध्ये विजेते ३ म्हैस स्पर्धक व ३ गाय स्पर्धक यांचा सपत्नीक सत्कार व मुंबई, पुणे, कोल्हापूर व कोकण येथील जास्तीतजास्त दूध वितरण करणा-या वितरकांचा सत्कार संघाचे चेअरमन रविंद्र आपटे व सर्व संचालकांच्या हस्ते करणेत आला.
यावेळी चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील, पी.डी.धुंदरे, उदय पाटील, आमदार राजेश पाटील, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्यजीत पाटील, विलास कांबळे, संचालीका अनुराधा पाटील,विजय उर्फ बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, शशिकांत पाटील-चुयेकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले. आभार माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी मानले.