आमदार पी.एन. पाटील वाढदिवस : कोल्हापूरचा अक्षय दांडेकर ‘आमदार श्री २०२४’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी( वडणगेत बी.एच. दादा युवक मंचचे आयोजन )
कोल्हापूर :
करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बी.एच. दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने वडणगे (ता. करवीर) येथे कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यां स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा अक्षय दांडेकर ‘ आमदार श्री २०२४ ‘ चा मानकरी ठरला. सर्व विजेत्यांना आमदार पी एन पाटील व मान्यवरांच्या रोख रक्कम, सन्मान चिन्ह तसेच प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
युवक मंचच्या नेटक्या नियोजनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तसेच ग्रामस्थांच्या गर्दीमुळे स्पर्धा उत्साहात पार पडली.
स्पर्धेमधील विजेते :
उत्कर्ष माने – बेस्ट पोझर,
सुनील सदावर- मोस्ट इंप्रूव्हर
60 किलो : सुनील सदावर (प्रथम ), ओमकार माळी (द्वितीय), सिद्धांत कांबळे (तृतीय )
65 किलो : विकी बावडेकर (प्रथम),जयकुमार मानकापूरे (द्वितीय), श्रीकांत नाईक (तृतीय)
70 किलो : अक्षय दांडेकर (प्रथम ), सचिन पालकर, (द्वितीय), सुरज शिंदे (तृतीय)
75 किलो: शौर्य देसाई ( प्रथम), ऋषिकेश पाटील (द्वितीय ), प्रतीक पाटील (तृतीय)
75 खुला गट: उत्कर्ष माळगे (प्रथम ), प्रशांत केबळे (द्वितीय), आदित्य भोईगडे (तृतीय).
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभप्रसंगी आमदार पी. एन.पाटील, माजी जि. प.सदस्य बी.एच.पाटील, युवा नेते रविंद्र पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक बिभीषण पाटील, मार्केट कमिटी सभापती भारत पाटील भुयेकर, सोसायटी चेअरमन अजित जाधव, माजी सरपंच सचिन चौगले, बीडचे सत्यजित पाटील, केवलसिंग रजपूत, के एस पाटील,दिलीप ठाणेकर,यशवंत नांगरे, नेताजी चौगले, महेश कालेकर,प्रवीण चौगले, विजय जाधव,विनोद पाटील,संभाजी मांगलेकर, उत्तम खुंदाळे,उत्तम साखळकर, ऋषिकेश ठाणेकर,नामदेव देवणे, मोहण नांगरे, नितीन नाईक,सुनील माने, उत्तम देवणे,पीराजी मेथे, बी आर पाटील,रवि मोरे,प्रसाद नर्देकर, अनिल तांबडे,विनायक पाटील, महादेव पाटील, प्रा राजकिरण बिरंजे, प्रा प्रशांत पाटील, श्रीधर माने, अध्यक्ष युवराज साळोखे उपस्थित होते. आर बी देवणे सर यांनी स्पर्धेचे समालोचन केले.