पोलवर चढून, वीज कनेक्शन जोडले
कोल्हापूर जिल्ह्यात वीज कनेक्शन जोडण्याची शेतकरी संघटना घेणार मोहीम
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना
करवीर :
पोलवर चढून, तोडलेले वीज कनेक्शन जोडले,
यामुळे ऊस पिकाला आता जीवदान मिळणार आहे. जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेती पंपाची वीज कनेक्शन तोडली आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागली आहेत. यामध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील वीज कनेक्शन जोडण्याची मोहीम शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे.
आज करवीर तालुक्यातील साबळेवाडी येथे एका शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी जोडले, आणि ऊस पिकाला पाणी मिळणार, शेतीपंप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तून समाधान व्यक्त करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष जाधव म्हणाले जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदीकाठची पिके साठ टक्के गेली आहेत ,अशा वेळी सरकारने दीडशे रुपये गुंठा देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, तसेच विद्युत महामंडळाने शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडली आहेत,या परिस्थितीत नदीकाठचे पुराने गेले आणि माळ राणावरील वीज नसल्यामुळे पीक हातचे गेले आहे ,यामुळे शेतकऱ्यांच्यात चिंता निर्माण झाली आहे.
महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी चौफेर अडचणीत आला आहे ,शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात वीज कनेक्शन जोडण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे यावेळी जाधव म्हणाले ,तसेच ताराबाई पार्क येथे १० तारखेला निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी शासनाच्या व महावितरणच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील ,सुग्रीव पाटील पन्हाळा तालुका अध्यक्ष डॉ. डी एम पाटील ,संभाजी चौगले, बाबासो फाळके, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सिद्धेश पाटील, अभिजीत जाधव उपस्थित होते.