विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये वैकल्पिक विषय
Tim Global :
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती ट्विटर वरून दिली आहे.
Uday Samant
@samant_uday
नागरी सेवा, सैन्य दल, पोलीस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2:56 PM · Sep 19, 2021
69
9
Copy link to Tweet
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जाणीव आणि शिस्तबध्दता निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच लष्करी सेवेबाबत आकर्षण निर्माण होण्याच्या दृष्टीने सदरचा अभ्यासक्रम उपयुक्त असून, विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे प्राथमिक प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे.
“नागरी सेवा, सैन्य दल, पोलीस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.