नेर्ली येथे गोकुळ शॉपी चे उद्घाटन सोहळा संपन्न
कोल्हापूर:०७.
उत्तम गुणवत्तेच्या जोरावर कोल्हापूर शहराबरोबरच खेडेगावातही गोकुळच्या दूध व दुग्धजन्यपदार्थ शॉपीचे उद्घाटन नेर्ली, ता.करवीर येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील,यांच्या हस्ते व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे तसेच करवीर पंचायत समिती सभापती श्रीमती मंगल पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील,कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि गोकुळच्या उच्च दर्जाच्या उत्पादनामुळे ग्राहकांचे निश्चितच समाधान होईल,असा विश्वास व्यक्त केला.
या गोकुळ शॉपी मध्ये दूध, तूप, पनीर, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, बासुंदी सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. नेर्ली,तामगांव परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
यावेळी गोकुळचे मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, शॉपीचे मालक अशोक गुरव, शंकर पाटील, भाऊसो चौगुले, के.टी.मगदुम, अजिक्य पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.