शेतीला पाणी मिळालेच पाहिजे असे नियोजन करा : इरिगेशन फेडरेशनची जलसंपदा विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर :
संभाव्य पाणीटंचाईचे कारण देत उपसाबंदी केली जात आहे. मात्र आतापासून पाण्याचे योग्य असे नियोजन करा. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात शेतीला पाणी नसल्याने मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतीला पाणी मिळालेच पाहिजे असे नियोजन करा अशी मागणी इरिगेशन फेडरेशनकडे केली. यासंदर्भात मागणीचे निवेदनही कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना देण्यात आले.
पाटबंधारे ऑफिस सिंचन भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे (दि.2 डिसेंबर ) झालेल्या इरिगेशन फेडरेशन, पाणीपुरवठा संस्था, कृषी पंपधारक यांच्याशी बैठकीत कार्यकारी अभियंता स्मिता माने म्हणाल्या, पुढे पाणी टंचाई जाणवू नये यासाठी नियोजन सुरु असून दूधगंगा व पंचगंगा नद्यांतील पाण्याबाबत आतापासूनच नियोजन केले जात असल्याचे सांगितले. १५ फेब्रुवारीपर्यंतचे नियोजन केले असून २० दिवसातून ३ वेळा उपसाबंदी करून शेतीला पाणी मिळेल असे नियोजन करत आहोत.
याबाबत विक्रांत पाटील किणीकर यांनी काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम मार्गी लावण्याची गरज आहे राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उपसाबंदीचा विचार करताना सर्व परिस्थितीचा विचार झाला पाहिजे. याबाबत फेरविचार करावा असे सांगितले. उपसाबंदीवेळी विद्युत पुरवठा खंडीत होऊ दिला नसला पाहिजे. महावितरणशीही अशी बैठक घेऊन चर्चा करू.
माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, दरवर्षी उपसाबंदीमुळे उन्हाळ्यात पिकांचे मोठे नुकसान होते. पाणी टंचाई आहे तर मग तुळशी, भोगावतीतून ज्यादाचा विसर्ग कसा होत आहे. काहीही करा, पण उन्हाळ्यात शेतीला पाणी कमी पडता कामा नये. उन्हाळ्यात पिकांना पाण्याची असलेली गरज ओळखून त्यादृष्टीने विचार झाला पाहिजे.
यावेळी माजी आमदार संजय घाटगे, बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर,
चंद्रकांत पाटील- पाडळीकर ,सुभाष शहापुरे,आर. के.पाटील,सखाराम पाटील,सखाराम चव्हाण,सागर पाटील व सचिव मारुती पाटील आदींसह सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी, कृषी पंपधारक शेतकरी उपस्थित होते.