विदर्भ : मूर्तिजापूर – तालुक्यासह महाराष्ट्रात रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास आकाशात अचानक उल्का पडताना दिसली
विदर्भ :
मूर्तिजापूर – तालुक्यासह महाराष्ट्रात दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास आकाशात अचानक उल्का पडताना दिसली.यामुळे विदर्भ मराठवाड्यात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. एके ठिकाणी एक मोठी लोखंडी रिंग सुद्धा सापडली आहे.
ANI@ANI#WATCH | Maharashtra: In what appears to be a meteor shower was witnessed over the skies of Nagpur & several other parts of the state.

Watch on Twitter10:16 PM · Apr 2, 20223.5KReply
8 वाजताच्या सुमारास आकाशातून उल्का वर्षाव झाल्यासारखे रांगेत लाल गोळे जमिनीच्या दिशेने आले.आकाशात लाल गोळे बघून लोकांनी कुतूहलाने त्याकडे बघितले. चंद्रपूर खगोल अभ्यासक डॉ. योगेश दूधपाचारे यांना गोंडपिपरी, धाबा भागात ही घटना झाल्याचे सांगण्यात आले. मात्र तिथे फक्त लाल गोळे दिसल्याचे लोकांनी सांगितले. मात्र रात्री 10 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे एक मोठी लोखंडी रिंग पडली. ही रिंग आकाशातून कोसळलेल्या सँटेलाइटची असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशातून पडलेली ही रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार सिदेवाही पोलिस ठाण्यात रिंग जमा करण्यात आली आहे. 8 ते 10 फूट मिटरची ही रिंग आहे.
अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असु शकतात.
हवामान तज्ञ
प्रा.अनिल बंड