ई.पी.एस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीला ऊर्जा देण्याचे काम ‘गोकुळ’ करेल : अरुण डोंगळे
कोल्हापूर ता २४ :
गोकुळ दूध संघ हा संघर्ष समितीच्या पाठीशी आहे. त्यांना ऊर्जा देण्याचे काम गोकुळ दूध संघ नक्कीच करेल व संघर्ष समितीचे काम कौतुकास्पद आहे. गोकुळने नेहमी कर्मचाऱ्यांचे हित जोपासले आहे. असे प्रतिपादन
माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनी केले.
ई.पी.एस-९५राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) ला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी या संघर्ष समितीला पाठिंबा व शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेवा निवृत्त कमांडर अशोक राऊत यांनी ई.पी.एस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती देशातील सत्तावीस राज्यांमध्ये ६७ लक्ष पेन्शनराच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यरत आहे. सदर पेन्शनरांनी त्याना दरमहा रुपये शंभर ते २००० इतक्या अल्प प्रमाणात मिळणाऱ्या पेन्शनमध्ये त्यांनी जगायचे कसे हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. पेन्शनराबरोबरच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान यावर सविस्तर चर्चा झाली व त्यासाठी त्यांनी दिनांक १९ डिसेंबर २०२१ इ रोजी लखनऊ येथे आयोजित केलेल्या मेळाव्यास ई.पी.एस-९५ अंतर्गत पेन्शनरा समिती बरोबरच कार्यरत कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने हजर राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
यावेळी राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी श्री सुभाष पोखरकर, श्रीमती शोभा ताई आरस, सौ सरिताताई नारखेडे , समिदर, नारखेडे, वाळके, इंगळे ,उंबरहांडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी एस किल्लेदार, इतर संस्थांचे पदाधिकारी एस.डी. मगदूम, सुहास यादव, ऐनापुरे, जोग ,एच. एन.पाटील, इत्यादी पेन्शनर हजर होत व बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील,संघाचे माजी कर्मचारी पी.एस.महाडिक,सुनील कदम,किल्लेदार कर्मचारी संघटनेचे निकम,मल्हार पाटील व संघाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.