गोकुळ’ मुळे सीमाभागातील दूध उत्पादकांना चांगले दिवस येतील : आमदार श्रीमंत पाटील
कोल्हापूर:१४.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर संचलित शिवनेरी कृषी अभिवृध्दी क्लस्टर बल्क कुलर संघ बमनाळ (ता.अथणी, जि.बेळगांव) युनिटचे उद्घाटन आमदार श्रीमंत पाटील यांच्या शुभहस्ते व गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती झाले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले महाराष्ट्र व कर्नाटक सिमा भागात गोकुळने १२ बल्क कुलर युनिट चालू केली असुन संघ या बल्क कुलर मार्फत सरासरी १ लाख ६७ हजार प्रतिदिन दूध संकलन करत असून गोकुळ नेहमीच दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे दाम देण्याचा प्रयत्न केला आहे. दूध उत्पादकांच्या जोरावरच गोकुळचे नाव महाराष्ट्रात व इतर राज्यात आहे. यामध्ये सिमा भागातील दूध उत्पादकांचा ही मोलाचा वाटा आहे. दूध उत्पादकांनी दूध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी गोकुळच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण दूध संघास पाठवावे व गोकुळ निश्चितच दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला देईल असे उद्गगार काढले. दूध व्यवसायात महिलाचे योगदान महत्वाचे असुन व पुढाकार घेऊन दूध व्यवसाय वाढवावा असे अवाहन केले.
यावेळी बोलताना कागवाडचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील म्हणाले कि कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील दुग्ध व्यवसाय म्हणावा तसा वाढलेला नाही. यांचे कारण इथली जमीन, पाण्याची कमतरता व भौगोलिक स्थिती ही कारणे आहेत. परंतू गोकुळने आपल्या विविध योजना राबवुन दुग्ध व्यवसायाचे स्वरूप बदल्याची किमीया केली आहे. त्यामुळे गोकुळची दूध उत्पादकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण झाले असून. गोकुळ मुळे सीमाभागातील दूध उत्पादकांना चांगले दिवस येतील असे मनोगत व्यक्त केले तसेच कर्नाटक शासनाच्या दुग्ध व पशुसंवर्धन विभागामार्फत सिमाभागातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी सर्वातोपरी गोकुळला सहकार्या करण्याची ग्वाही दिली व गोकुळच्या कामामाजाचे कौतुक केले.
यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिवनेरी कृषी बल्क युनिटचे संस्थापक रामदास आवळेकर यांनी केले. यावेळी विनायक बागडी जि.प. सदस्य,सुरेश सलगरे, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी कर्नाटकचे माजी वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक मंत्री व कागवाडचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील, चेअरमन विश्वास पाटील(आबाजी),संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक अथणी शुगर श्रीनिवास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, शिवनेरी कृषी बल्क युनिटचे संस्थापक रामदास आवळेक,चेअरमन वर्षाराणी आवळेकर, गोकुळ दूध संघाचे अधिकारी, भागातील दूध उत्पादक व इतर मान्यवर उपस्थित होते.