१२२ वर्षांतील हा भारतातील सर्वात उष्ण मार्च ठरला

Tim Global :

भारतीय हवामान विभागा नुसार मार्च महिन्यातील तापमानाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत, मार्च १९०१ पासून १२२ वर्षांतील हा भारतातील सर्वात उष्ण मार्च ठरला आहे, ‘मार्च २०२२ ची मासिक सरासरी ३३.१ डिग्री सेल्सियस आहे. जी २०२१ मधील ३३.०९ डिग्री सेल्सियसचा मागील विक्रम मोडीत काढले आहेत.

दीर्घकाळापर्यंत दुष्काळामुळे वायव्य भारतात उष्ण हवामान निर्माण झाले आहे. गुरुवारी दिल्लीच्या काही भागांमध्ये तीव्र उष्मा होता, तीन ठिकाणी कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले.

३ ते ६ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशातील बहुतांश भागात उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडणे टाळत आहेत.

देशभरातील तापमानही यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. यासाठी ‘अल निनो’च्या स्थितीचा अभाव कारणीभूत ठरू शकते. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ओसरते तर ‘अल निनो’ स्थितीमध्ये हे तापमान वाढते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!